भूतान- जगातला रहस्यमय देश

bhutan
भारताचा शेजारी भूतान हा जागतिक पर्यटन क्षेत्रात रहस्यमय देश म्हणून ओळखला जातो. हिमालयाच्या कुशीत बसलेला हा देश निसर्गसौंदर्याने परिपूर्ण आहेच पण येथील नागरिकही अतिशय आनंदी आहेत. अमेरिकी मिडीया सीएनएनने भूतानचा उल्लेख मिस्टीरियस देश असाच केला आहे.

या देशाची राजधानी थिम्पू. जगातील ही एकमेव अशी राजधानी आहे जेथे ट्रॅफिक लाईटस नाहीत. जगातील बहुतेक सर्व देशांचा विकास हा तेथील दरडोई उत्पन्नावरून म्हणजे जीडीपीवरून मोजला जातो. भूतान त्याला अपवाद आहे. येथे नागरिकाचे दरडोई उत्पन्न किती याला फारसे महत्त्व दिले जात नाही तर माणसे किती समाधानी व आनंदी आहेत त्यावरून देशाचा विकास किती झाला हे ठरविले जाते.

जगभरातील अर्थतज्ञ समाधान हवे असेल तर पैसाच तो देऊ शकतो किंवा पैशांने विकत घेता येणार्‍या गोष्टीतून आनंद मिळविता येतो असे सांगतात तेव्हा भूतान मात्र सगळे कांही आंहे म्हणजे सुख आहे असे मानत नाही. ३८ हजार किमी परिसराचा हा देश माणसांना पैशांपेक्षाही मोठे मानणारा देश आहे.

Leave a Comment