पीएफ जमा करण्याचा अतिरिक्त कालावधी रद्द

epfo
नवी दिल्ली : ईपीएफओकडून पीएफ जमा करण्याचा कालावधी उलटल्यानंतर देण्यात येणारा पाच दिवसांचा अतिरिक्त अवधी आता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाची पुढील महिन्यापासून अंमलबजावणी केली जाईल.

कर्मचा-यांचा पीएफ कंपनीने किंवा मालकाने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसातच जमा करणे अनिवार्य आहे. या कालावधीत पीएफ जमा करणे शक्य न झाल्यास संघटनेकडून अधिक पाच दिवसांची अतिरिक्त मुदत यापूर्वी देण्यात येत असे. कित्येकदा पीएफची मोजदाद करण्यास जास्त वेळ जात असल्याचे लक्षात घेऊन, ही मुदत संघटनेने देऊ केली होती. मात्र आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना १९५२, कर्मचारी निवृत्ती वेतन योजना १९९५ व कर्मचारी ठेव संलग्न विमा योजना १९७६ या तिन्ही कायद्यांतर्गत कर्मचा-यांचे वेतन व लाभ याची मोजदाद इलेक्टड्ढॉनिक पद्धतीने केली जाते. अनेक कंपन्या व मालक त्यांचे इलेक्ट्रॉनिकनिक चलन कम रिटर्नही इलेक्टड्ढॉनिक पद्धतीनेच फाईल करतात. त्यामुळेच आता हे काम पूर्वीइतके किचकट राहिले नसल्याची बाब निदर्शनास आल्याने ईपीएफओने हा वाढीव कालावधी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सूत्राने दिली.

Leave a Comment