जीप भारतीय बाजारात प्रवेशास सज्ज

jeep
कार कंपनी फिएटची एसयूव्ही ब्रँड जीप भारतीय बाजारात प्रवेशासाठी सज्ज झाली असून ती दिल्लीत पुढील महिन्यात होत असलेल्या ऑटो एक्स्पोमध्ये सादर केली जाणार आहे. जीपचे सीईओ माईक मेनले यांनी जीपच्या विक्रीची घोषणा लवकरच केली जाईल असे सांगितले. ते म्हणाले ऑटो एक्स्पोत आम्ही दोन ते तीन मॉडेल्स सादर करत आहोत.

अर्थात भारतीय बाजारात उतरताना सुरवातीच्या मॉडेल्समध्ये वेंगलर व चेरूकी ही मॉडेल्स आणली जातील. २०१७ पर्यंत कंपनीने १५०० ते २०० वाहने विकण्याचे उदिष्ट ठेवले आहे. या मॉडेल्सच्या किंमती अनुक्रमे ३० लाख व ६० लाखांच्या दरम्यान असतील. २०१६ च्या दुसर्‍या सहामाहीत ही मॉडेल्स भारतात विक्रीसाठी येतील. गेली सहा वर्षे ग्लोबल मार्केटमध्ये कंपनीच्या विक्रीचा आलेख चढता राहिला आहे. भारतात विक्रीसाठी १० ते १५ शहरांतून वितरक नेमले जाणार असल्याचेही जाहीर केले गेले आहे.

Leave a Comment