ई सिगरेटसहचा स्मार्टफोन ज्युपिटर आयओ ३ लाँच

jupiter
स्मार्टफोनच्या सहाय्याने एकाच वेळी अनेक कामे करता यावीत यासाठी दररोज नवनवीन फिचर्स अॅड होत असतानाच अमेरिकन कंपनी वेपरकोडने केवळ कॉल करणाराच नाही तर आपल्या आवडीच्या फ्लेवरच्या ईसिगरेटचा स्वादही घेऊ देणारा स्मार्टफोन ज्युपिटर आयओ ३ बाजारात आणला आहे. या फोनमुळे स्मोकिंग सोडण्यास मदत होते असाही कंपनीचा दावा आहे. जगातला हा पहिलाच इनबिल्ट ई सिगरेट असलेला हँडसेट आहे. या थ्रीजी फोनची किंमत २९९ डॉलर्स म्हणजे १९७०० रूपये इतकी आहे. वेपरकोड ही कंपनी ई सिगरेट, सिगार व कॉफीबिन्स विकते.

या फोनसाठी दोन बॅटरी दिल्या गेल्या आहेत. एक बॅटरी फोनसाठी तर दुसरी ईसिगरेट साठी आहे. मा दोन्हीचे लाईफ एकत्रच आहे. त्यामुळे ई सिगरेटचे झुरके जास्त प्रमाणात घेतले तर फोन कमी वेळ चालेल. या फोनला प्लॅस्टीक कव्हर दिले असून त्यातच वरच्या बाजूला एक फट ठेवली गेली आहे. त्यात लिक्विड कार्टरेज भरून माऊथपीस लावता येतो. येथेच असलेले एक बटण दाबून उष्णता नियंत्रण करता येते व सिगरेटचे झुरके मारता येतात. कार्टरेजची किंमत १५ डॉलर्स असून त्यात मिंट, पीच व कॉफी असे स्वादही आहेत. एका कार्टरिजमध्ये ८०० झुरके मारता येतात.

या फोनसाठी एक अॅपही दिले गेले आहे जे बॅटरी लाईफ, कार्टरिजमध्ये किती लिक्विड शिल्लक आहे, फ्लेवर कोणता आहे व किती झुरके मारले गेले याची माहिती देते. या फोनसाठी किटकॅट ४.४ ओएस, फ्लॅशसह कॅमेरा अशी फिचर्सही आहेत.

Leave a Comment