चंद्रावर २०३० पर्यंत वसविले जाणार गांव

moon
नेदरलँड मधल्या युरोपियन अंतराळ संस्थेच्या मते २०२० ते २०३० या दरम्यान चंद्रावर अंतराळवीरांसाठी गांव वसविले जाणे शक्य होणार आहे. पुढच्या दशकात चंद्रावर गांव वसविण्याचे स्वप्न पूर्ततेच्या दिशेने मार्गी लागेल व या वसाहतीचा सर्वाधिक फायदा भविष्यातील मंगळ व अन्य लघुग्रहांवरील मानवी मोहिमांसाठी होईल असाही दावा केला जात आहे.

नासाकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार २०२० मध्ये वसाहतीसाठी आवश्यक सुविधा निर्माण कार्य सुरू केले जाईल व त्यासाठी रोबो चंद्रावर पाठविले जातील. ही वसाहत मंगळ वा अन्य ग्रहांवरील मानवी मोहिमांसाठी प्राथमिक डिपार्चर म्हणून उपयुक्त ठरणार आहे. अन्य ग्रहांवरील मोहीमांवर जाताना अंतराळवीर चंद्रावरील वसाहतीत स्टॉप घेऊन पुढे जाऊ शकतील असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment