४० दिवसांचा बॅटरी बॅकअप देणार जिओनीचा ‘एम५ लाईट’

gionee
मुंबई : भारतात ‘एम५ लाईट’ हा स्मार्टफोन जिओनी या चायनिज स्मार्टफोन मेकर कंपनीने लॉन्च केला असून या स्मार्टफोनचे जबरदस्त बॅटरी बॅकअप हे वैशिष्ट्य असून या स्मार्टफोनची किंमत १२ हजार ९९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन गेल्या महिन्यातच चीनमध्ये लॉन्च करण्यात आला होता.

एम५ लाईट स्मार्टफोन मॅरेथॉन सीरीजमधील इतर हँडसेटच्या तुलनेत बॅटरीच्या बाबती उजवा असून या स्मार्टफोनमध्ये कंपनीने ४००० mAh क्षमतेची लिथियम-पॉलिमर बॅटरी दिली आहे. ही बॅटरी ४० तासांचा टॉकटाईम आणि ६८ तासांचे प्लेबॅक देऊ शकते. त्यासोबत ३९ दिवसांपर्यंत स्टँडबाय टाईम देऊ शकते. शिवाय या स्मार्टफोनला दुसऱ्या स्मार्टफोनच्या चार्जरनेही चार्जिंग करु शकता, असा दावा जिओनीने केला आहे.

कसा आहे जिओनीचा एम५ : – याचा डिस्प्ले ५ इंचाचा असून ७२०×१२८० एवढे त्याचे रिझॉल्युशन असून यात १.३GHz चा क्वाडकोर मीडियोटेक प्रोसेसर त्याचबरोबर यात ३ जीबी रॅम आणि इंटरनल मेमरी ३२जीबी देण्यात आली आहे. याचे ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉईड ५.१ लॉलिपॉप बेस आहे. या ८ मेगापिक्सेलचा ऑटोफोकस रिअर तर ५ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा ४ जीला सपोर्ट करतो.

Leave a Comment