१२ नवीन उत्पादने भारतात दाखल करणार मर्सिडीज

mercedez
नवी दिल्ली – सतत मर्सिडीज बेंझच्या कार विक्रीमध्ये वाढ होत असून १२ नवीन उत्पादने चालू वर्षात कंपनी भारतीय बाजारामध्ये दाखल करणार आहे. मागील वर्षात भारतात जर्मनीची लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज बेंझने एकूण १३,५०२ वाहनांची विक्री केली असून, भारतीय बाजारामध्ये २०१४मध्ये त्यांनी १०,२०१ वाहनांची विक्री केली होती. या प्रकारे कंपनीने मागील वर्षात विक्रीचा विक्रम केला असून त्यांच्या वाहन विक्रीमध्ये ३२ टक्के वाढ झाली आहे.

२०१६ मध्ये कंपनीने त्यांची १२ नवीन उत्पादने दाखल करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या १३,५०२ वाहनांची विक्री जानेवारी ते डिसेंबर २०१५ दरम्यान झाली आहे. ही त्यांनी भारतामध्ये वाहनांची विक्री सुरू केल्यानंतर सर्वात मोठी विक्री ठरली आहे.

मर्सिडीझ बेंझ भारताचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रोलँड फोल्गेर यांनी आमची उत्कृष्ट उत्पादने आणि नेटवर्क विस्तार तसेच व्यापक विक्री नेटवर्क आणि आर्थिक कार्यक्रम यांच्यामुळे प्रतिकूल बाजार आणि मंद अर्थव्यवस्था असूनही आम्ही आमचे ध्येय गाठण्यात यशस्वी झालो असल्याचे म्हटले आहे. वर्ष २०१६ दरम्यान कंपनी आपली १२ नवीन उत्पादने बाजारात दाखल करणार आहे. त्यातील काही उत्पादने याच्याअगोदर भारतात उपलब्ध नाहीत. त्याच्यासह मर्सिडीझ बेंझ बाजारामध्ये आपले १० नवीन विक्री केंद्र उघडणार आहे.

Leave a Comment