स्वस्त आणि मस्त शाओमीचा ‘रेडमी ३’

xaiomi
मुंबई : रेडमी ३ हा स्मार्टफोन चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने लाँच केला असून रेडमी ३ सुद्धा रेडमी २ प्रमाणेच शानदार फीचर्स असलेला स्वस्त आणि मस्त फोन असल्याचा दावा केला जात आहे. रेडमी ३ हा स्मार्टफोन ६९९ चीनी युआन म्हणजेच अंदाजे ७ हजारांच्या घरात उपलब्ध असेल. तूर्तास भारतीय बाजारपेठेतील उपलब्धतेबाबत मात्र कंपनीने मौन बाळगले आहे.

ड्यूएल सीम ड्यूएल स्टँडबाय असा शाओमीचा रेडमी ३ हा स्मार्टफोन असून या फोनमध्ये हायब्रिड सीम स्लॉट आहे. मायक्रोएसडी कार्ड वापरताना तुम्ही फक्त एकच सीम वापरु शकाल. मात्र दोन्ही सीम स्लॉट ४जी एलटीई कनेक्टिव्हीटीसह आहेत. रेडमी ३ चे ४१००एमएएच क्षमतेची बॅटरी हे वैशिष्ट्य मानावे लागेल. मागील जनरेशनच्या रेडमी २ हँडसेटच्या तुलनेत रेडमी ३ची बॅटरी ८० टक्के अधिक टॉकटाईम देईल, असा दावा कंपनीने केला आहे. पाच इंचाचा एचडी रिझोल्युशन डिस्प्ले रेडमी ३ला आहे. २ जीबी रॅम आणि इनबिल्ट १६ जीबी मेमरी असून ती १२८ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. रेडमी ३ चा रिअर कॅमेरा १३ मेगापिक्सलचा आणि फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सलचा आहे. यूझर्सना आकर्षक वाटेल असे फोनचे डिझाईन आहे. प्लास्टिकला छेद देत कंपनीने मेटॅलिक बॉडीचा वापर केला आहे. हा फोन गोल्ड, सिल्व्हर आणि ग्रे कलरमध्ये उपलब्ध आहे.

Leave a Comment