वाय फायच्या पासवर्डचा शोधणारे अॅप

wifi
अनेकदा स्मार्टफोन वापरताना वायफायचा पासवर्ड विसरण्याची शक्यता असते. त्यामुळे साधारणतः मोबाईल क्रमांकच पासवर्ड म्हणून ठेवला जातो. मात्र हे धोकादायक ठरू शकते. पण आता मात्र तुम्ही हे टाळू शकता. कारण आता पासवर्ड शोधणारे ‘वाय-फाय रिकव्हरी’ अॅप तुम्ही तुमच्या अँड्रॉइड मोबाईलवर किंवा टॅबवर सहज डाऊनलोड करू शकता. हे केल्यावर अॅपला ‘सुपर यूजर अॅक्सेस’ द्या. स्क्रीनवर तुम्ही कनेक्ट करणाऱ्या वायफायची यादी आणि वायफाय नेटवर्क एकाच वेळी दिसेल. वायफाय लिस्ट मोठी असल्यास तुम्हाला नेटवर्कचे नाव टाकून शोध घ्यावा लागेल. त्यानंतर ‘एक्सपोर्ट’ हा पर्याय निवडल्यास एकाच फाईलमध्ये सर्व नेटवर्कची नावे आणि पासवर्ड दिसतात. यातील कोणतीही सिस्टम काम करत नसल्यास राऊटर रिसेट दाबावे. यामुळे तुमच्या फोनमधील राऊटर रिसेट होईल. त्यात नवीन पासवर्ड टाकून तुम्ही ब्रॉडबँडसाठी सेटअप करु शकता.

Leave a Comment