फोल्डेबल स्क्रीनचा स्मार्टफोन लॉन्च करणार सॅमसंग

samsaung
नवी दिल्ली : फोल्डेबल स्क्रीन असलेला स्मार्टफोन सॅमसंग कंपनी लॉन्च करणार असून सॅमसंगचा हा स्मार्टफोन पहिला फोल्डेबल स्मार्टफोन असणार आहे. ग्राहकांना या स्मार्टफोनसाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही. कारण याच वर्षी मे-जूनच्या दरम्यान हा स्मार्टफोन लॉन्च होण्याची शक्यत आहे.

या प्रोजेक्टचे नाव सॅमसंगने ‘व्हॅली’ असे ठेवल्याची माहिती मिळत असून खरंतर हा स्मार्टफोन २०१६च्या सुरुवातीलाच लॉन्च केला जाणार होता. पण आता मे किंवा जून महिन्यात हा फोल्डेबल स्क्रीन असलेला हा स्मार्टफोन लॉन्च होणार आहे. सॅमसंगकडून अधिकृतरित्या फोल्डेबल स्क्रीन स्मार्टफोनबाबत माहिती देण्यात आली नाही. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन तुमच्या हातून पडला, तरीही तुटणार नाही. तुमच्या सोयीनुसार या स्मार्टफोनची स्क्रीन लहान-मोठी करु शकता. आयफोनसारखी नॉन-रिमोव्हेबल बॅटरी या स्मार्टफोनलाही असणार आहे. यामध्ये ३ जीबी रॅम असण्याची शक्यता आहे.

Leave a Comment