कच्च्या तेलाच्या किंमती २० डॉलर्सवर येतील-मॉर्गन स्टॅनले

crude
अमेरिकेन बँक मॉर्गन स्टॅनलेने चीनी चलनाचे अवमूल्यन झाल्याने कच्च्या तेलाच्या किमती कांही दिवसांतच २० डॉलर्सपर्यंत उतरण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सौदीने किंमती घटत असल्या तरी तेलाचे उत्पादन पूर्ण क्षमतेने सुरू ठेवले आहे त्यामुळे आत्ताच मागणीपेक्षाही अधिक तेल बाजारात आहे. त्यात लवकरच ईराण मधून तेलाचा नवा पुरवठा सुरू होणार आहे . परिणामी तेलाच्या किंमती घसरत राहतील असे त्यांचे म्हणणे आहे.

तेलाच्या किंमती घसरत चालल्याने सोन्याचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. यावरून गुंतवणूकदारांनी तेलातील गुंतवणूक कमी केल्याचे लक्षण आहे. तरीही तेलाच्या किंमती स्थिर होण्याची शक्यता नाही. कारण तेलाचे भाव हे प्रामुख्याने डॉलर्सवर अवलंबून असतात आणि सध्या बाजारात डॉलर चांगलाच मजबूत होत आहे. यामुळेच तेलाच्या किमतीतील घसरण थांबणे अवघड असल्याचे या बँकेतील अर्थतज्ञांचे म्हणणे आहे.

Leave a Comment