कॅनेडियन स्मार्टफोन उत्पादक कंपनी ब्लॅकबेरी या वर्षात म्हणजे २०१६ मध्ये फक्त अँड्राईड ओएस वालेच स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. ही घोषणा कंपनीचे सीईओ जॉन चेन यांनी वेगास येथे सुरू असलेल्या सीईएस मध्ये केली आहे. याचाच सरळ अर्थ असा की कंपनी त्यांची स्वतःची बीबी१० ऑपरेटिंग सिस्टीम नवीन वर्षात येणार्या फोनसाठी वापरणार नाही.
ब्लॅकबेरी या वर्षात फक्त अँड्राईड फोनच बनविणार
जॉन चेन यांनी केलेल्या खुलाशानुसार कंपनी किमान १ अॅंड्राईड स्मार्टफोन या वर्षात बाजारात आणेल. त्याचा परफॉर्मन्स बघून दुसरा फोन आणला जाईल. ब्लॅकबेरीने व्हिएन्ना कोडनेमने एका स्मार्टफोनवर काम सुरू केले असून या फोनसाठी फोन उत्पादक कंपन्यांनी डिझाईन्सही सुचविली आहेत. ती ब्लॅकबेरीच्या क्लासिक मॉडेल्सची मिळतीजुळती आहेत असे समजते. त्यात फिजिकल कीबोर्डसह मोठा स्क्रीन व टेक्चरर बॅक आहे. यापूर्वी कंपनीने सादर केलेल्या प्रिव्ह या अॅंड्राईड बेस स्मार्टफोनला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.