पश्चिम बंगालमध्ये गुंतवणूक वाढवणार आयटीसी, एअरटेल

airtel
कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये याच्या अगोदर आयटीसी कंपनीने ४५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून अन्न प्रकिया सयंत्र आणि लॉजिस्टिक पार्क निर्माण करण्याचे सुरू आहे. कंपनी आयटीसी सोनारच्या जवळ आणखी एका हॉटेलची निर्मिती करत आहे. यापुढेही मोठी गुंतवणूक करण्याचा कंपनीचा विचार असल्याचे कंपनीचे अध्यक्ष वाय सी देवेश्वर यांनी म्हटले आहे. एअरटेलसह भारती समुहाने राज्यामध्ये ९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. पुढील तीन वर्षामध्ये ३५०० कोटी रुपयांची आणखी गुंतवणूक करण्यात येणार असल्याची माहिती भारती एंटरप्रायझेसचे उपाध्यक्ष राकेश भारती मित्तल यांनी दिली आहे.

Leave a Comment