जगातील सर्वांत सेक्सी रोबोट चीनच्या रोबोट परिषदेत !

robo
बीजिंग : एका रोबोटने येथे भरलेल्या जागतिक यंत्रमानव परिषदेत सर्वांनाच वेड लावले आहे. जेमिनॉयड एफ नावाच्या या हुबेहूब मुलीसारखा दिसणा-या रोबोटने सर्वांनाच आकर्षित केले.

या रोबोची जगातील सर्वांत सेक्सी रोबो अशी ओळख तयार झाली असून हा रबरी रोबो बोलतो, गातो आणि चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेप्रमाणे तो वर्तनही करतो. या रोबोने सर्वच माध्यमांचे लक्ष नुकतेच वेधले होते. तसेच हेडलाईनची जागाही या रोबोला मिळाली होती. कारणच तसे होते. जपानी चित्रपट सायोनारामध्ये हा रोबो काम करणार अशी घोषणा करण्यात आली होती. ओसाका विद्यापीठाची निर्मिता असलेला हा महिला रोबोट एखाद्या सुंदर २० वर्षांच्या जिवंत मुलीसारखा दिसते. ख-या माणसांप्रमाणे हावभाव करणे, बोलणे या गोष्टी हा रोबो लीलया करू शकतो. काही वेळा भावनेनुसार या रोबोची सिलिकॉन जेलपासून तयार केलेली त्वचा वृद्धत्वाचाही अनुभव देऊ शकते.

Leave a Comment