१६ वाघ व्याघ्रगणनेच्या चौथ्या टप्प्यांत वाढले

tadoba
चंद्रपूर : ८८ पट्टेदार वाघांची ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर व बफरच्या १७०० चौ.कि.मी. जंगलात नोंद घेण्यात आली असून वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ डेहराडूनचे डॉ. हबीब बिलाल यांनी व्याघ्रगणनेच्या चौथ्या टप्प्यांचा ताजा अहवाल वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक भगवान यांच्याकडे सुपुर्द केला. त्यानुसार ताडोबात या वर्षी वाघांची संख्या १६ ने वाढली आहे.

ही व्याघ्र संवर्धनाची सुखावणारी आकडेवारी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर व बफर क्षेत्रात व्याघ्रगणनेच्या चौथ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर समोर आली आहे. गेल्या वर्षी जानेवारी-मे २०१५ मध्ये टप्पा ४ चे ‘मॉनिटरिंग वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ डेहराडून’ चे प्रमुख अभ्यासक डॉ. हबीब बिलाल व सहका-यांच्या मदतीने करण्यात आले होते. यासाठी ताडोबाच्या कोअर व बफरच्या १७०० चौ.कि.मी. जंगलात ३८१ कॅमेरा ट्रप सलग २४ तास १२० दिवस ठेवण्यात आले होते. यातून ९ हजार १४४ छायाचित्रे घेण्यात आली. यात ताडोबा कोअर क्षेत्रातील ६२५ चौ.कि.मी.मध्ये ५१ पूर्ण वाढ झालेल्या वाघांची, तर बफर क्षेत्रात १४ वाघांची छायाचित्रे आहेत, तसेच या दोन्ही क्षेत्रांत ये-जा करणारे ६ वाघ आहेत. या सर्व छायाचित्रांच्या अभ्यासानंतर ताडोबात ८८ वाघ असल्याची नोंद घेण्यात आली आहे.

Leave a Comment