हर्ले डेव्हीडसनची तीन चाकी मोटरसायकल

harley
अतिशय दणकट मोटरबाईक उत्पादनासाठी जगात प्रसिद्ध असलेल्या हर्ले डेव्हीडसन कंपनीची तीन चाकांची मोटरसायकल आपण पाहिली आहे काय? ही लग्झरी मोटरसायकल फ्रीव्हीलर म्हणून ओळखली जाते. प्रथमदर्शी ही मोटरसायकलही त्यांच्या टूअरर व क्रूझर सारखीच असली तरी तिच्या तीन चाकांमुळे ती वेगळी ठरते.

या मोटरसायकलला दमदार इंटीग्रेटेड ऑईल कूलर एअर कूल्ड हाय आऊटपूट ट्विन कॅम इंजिन दिले गेले आहे. १६९० सीसी क्षमतेचे हे इंजिन स्पीड क्रूज ड्राईव्ह ट्रान्समिशनने जोडलेले आहे शिवाय त्याला इलेक्ट्राॅनिक क्रूझ कंट्रोल सुविधाही दिली गेली आहे. स्टॉप/ टेल टर्न एलईडी रिअर लायटिग व्यवस्था असून सीटची क्वालिटी अतिशय उच्च दर्जाची आहे. यामुळे दीर्घ अंतराचा प्रवासही आरामदायी होऊ शकतो असा कंपनीचा दावा आहे. या मोटरसायकलची किंमत अमेरिकेत २५४९९ डॉलर्स इतकी आहे.

Leave a Comment