देशातली दहा आकर्षक कार्यालये

collarge
भारत हा मुळातच विविधतेने नटलेला देश. येथील प्रत्येक प्रांताचे वास्तूशिल्प आपापल्या वैशिष्ठ्यांनी परिपूर्ण आहेच. भारतातील अशा वैविध्यपूर्ण इमारती पाहण्यासाठी पर्यटकही मोठ्या प्रमाणावर येत असतात. प्राचीन वास्तूंबरोबरच आता नवीन वास्तूही आपले कांही खास वेगळेपण दाखवू लागल्या आहेत. वास्तूरचनेचा विकास यातून दिसून येतो. आज देशांतील कांही खास ऑफिसेस पाहण्यासाठीही लोक गर्दी करत असतात. अशाच दहा खास इमारतींची ही माहिती

१)नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड
1-national-fisheries
हैद्राबाद मधली ही सरकारी कार्यालयाची इमारत. वास्तविक सरकारी इमारती बहुतेक ठिकाणी सरकारी छापाच्याच असतात. मात्र ही इमारत त्याला अपवाद आहे. हैद्राबादचे या विभागाचे हे मुख्यालय चक्क माशाच्या आकाराचे आहे. चार मजल्यांची ही इमारत २०१२ साली बांधली गेली आहे.

२)इन्फोसिस कॅम्पस, मैसूर
2-infosys-campus
देशातील आयटी क्षेत्रातील अग्रणी इन्फोसिसचे हे कँपस ३३७ एकरात पसरलेले असून ते प्रथम पाहताक्षणी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवासाशी म्हणजे व्हाईट हाऊसची आठवण जागी करते. अधिकाधिक सूर्यप्रकाश आत यावा या पद्धतीने ही इमारत बांधली गेली आहे. रेन वॉटर हार्वेस्टींगच्या सुविधेमुळे १५ हजार लोकांची पाण्याची गरज पूर्ण होते. वापरलेले पाणी रिसायकल करून पुन्हा वापरले जाते. देशातले हे सर्वात मोठे प्रशिक्षण केंद्र असून येथे १५ हजार लोकांना एकाचवेळी प्रशिक्षण देण्याची सोय आहे. येथे १६ हजार सॉफ्टवेअर डेव्हलपर सीट, १० हजार खोल्या व ट्रेनींसाठी १४५०० बेडस अशा सुविधाही आहेत.

३) पटनी नॉलेज पार्क मुंबई
3-patni-knoledge
ऐरोली भागातले हे आयगेट नॉलेज पार्क. देशाच्या आर्थिक राजधानीतील बड्या सॉफ्टवेअर पार्कमध्ये याची गणना केली जाते. येथील इमारतीत १७ हजार प्रोफेशनल एका वेळी बसू शकतात. या दोन बिल्डींगच्या मध्ये एक उंच स्ट्रक्चर बनविले गेले असून तो उत्तम दर्जाच्या वास्तूरचनेचा नमुना मानला गेला आहे.

४) इन्फोसिस, पुणे
4-infosys-pune
पुण्याच्या आयटी हब हिंजेवाडी येथे असलेले इन्फोसिसचे हे ऑफिस. याचे डिझाईन एखाद्या रग्बी बॉलसारखे आहे. मात्र प्रत्यक्ष पाहताना ही इमारत एखाद्या स्पेसशीप सारखी दिसते. हे आफिस हायटेक टेक्नॉलॉजीने परिपूर्ण आहे.

५)स्टेटसमन हाऊस
5-statemans-house
नवी दिल्लीच्या पॉश कॅनॉट प्लेसमध्ये सर्व इमारतीत वेगळेपणाने उठून दिसणारी ही इमारत. लक्षपूर्वक न्याहाळली तर ती गॅसच्या सिलींडरच्या आकाराची वाटते.

६)आयफ्लेक्स सोल्युशन लिमिटेड
6-i-flex
बंगलोर मधील आयफ्लेक्स सोल्युशनच्या कार्यालयाची ही इमारत प्रथमदर्शनी एखाद्या बॉक्सच्या आकाराची वाटते. १ लाख ४४ हजार चौरस फूट जागा असलेल्या या इमारतीत १५०० कर्मचारी काम करतात.

७) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस
7-tata-consultancy
सिरूसेरी चेन्नईमधली ही टीसीएस पार्क ७० एकर परिसरात पसरलेली आहे. या इमारतीचे डिझाईन कारलेस ओट फर्मने तयार केले असून ते फुलपाखरासारखे आहे. दोन्ही बाजूला ६ विंग व मध्ये पाठीच्या कण्यासारखा आकार अगदी फुलपाखराची आठवण करून देणारा आहे.

८)बाटा बिल्डींग
8-bata
गुडगांव येथील सेक्टर १८ मध्ये असलेली ही इमारत. या अनेक मजली इमारतीचे डिझाईन वेडेवाकडे म्हणावे असेच आहे. मात्र तेच तिचे वेगळेपण ठरले आहे. यात वाकविलेल्या रंगात काचांची जी कलाकारी केली आहे त्यामुळे पाहणार्‍यांचे डोळे खिळून जातात. या काचांनीच तिला आकर्षक बनविले आहे.

९)कॅपिटल कोर्ट मुनिर्का

9-capital
दिल्लीच्या जुन्या पालम रस्त्यावरची ही इमारत. येथे अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांची कार्यालये आहेत. चारी बाजूंनी हिरवाईने नटलेली ही इमारत तिच्या डिझाईनमुळे आणखी खास बनली आहे. या इमारतीवर बसविली गेलेली तिरकी उतरती काच इमारतीच्या सौंदर्यात भर घालते आहे.

१०) आय टी पार्क चंदिगढ

10-it-park
चंदिगड हे मुळातच अगोदर कागदावर आखून वसविले गेलेले शहर. या शहरात अनेक वैविध्यपूर्ण इमारती आहेत. त्यातील आयटी पार्क ही एक इमारत. या इमारतीचा आकार एखाद्या प्रचंड जहाजाची आठवण करून देतो.

Leave a Comment