२० जानेवारीला टिव्हीएसच्या ‘व्हिक्टर’चे रिलाँचिंग

tvs-victor
नवी दिल्ली : पुन्हा बाजारात दाखल होण्यासाठी २००१मध्ये विक्रीत अव्वल राहिलेली ‘टिव्हीएस व्हिक्टर’ सज्ज झाली असून ही बाईक येत्या २० जानेवारीला पुन्हा लाँच होत आहे.

टिव्हीएस व्हिक्टर बाजारात टिव्हीएस स्टार सिटीच्या धर्तीवर कमी बजेट असलेल्या ग्राहकांना डोळयासमोर ठेवून दाखल करण्यात येणार आहे. अनेक नव्या फिचर्सचा या बाईकमध्ये समावेश असल्याची चर्चा असली तरी अद्याप या बाईकचे फिचर्स आणि किंमतीबाबत कोणतीही माहिती कंपनीकडून देण्यात आलेली नाही. सध्या कमी बजेटमध्ये हिरो कंपनीच्या बाईकना ग्राहकांची पसंती मिळत असल्यामुळे टिव्हीएस व्हिक्टर आणि हिरो बाईकमध्ये स्पर्धा पहायला मिळणार आहे.

२००१मध्ये ११० सीसी इंजिनची ही बाईक सर्वप्रथम लाँच करण्यात आली होती. त्यावेळी प्रत्येक महिन्याला या बाईकच्या ४० हजार युनीटची विक्री होत होती. त्यानंतर टिव्हीएस व्हिक्टरचे उत्पादन २००७मध्ये बंद करण्यात आले होते.