नवी दिल्ली : कंझ्युमर इलेक्ट्रोनिक शो२०१६च्या ट्रेड शोच्या आधीच चायनीज कंपनी लेनोवोने नवा स्मार्टफोन वाइब एस१ लाइट लाँच केला आहे. याची किंमत साधारण १३,२५० रुपये असून या फोनची मार्च २०१६ पासून विक्री सुरु होऊ शकते. फिकट निळा आणि पांढऱ्या रंगात हा स्मार्टफोन उपलब्ध आहे.
लेनोवोचा ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असलेला स्मार्टफोन
या स्मार्टफोनचा डिस्प्ले ५ इंचाचा असून यात १.३ गिगाहर्टज ओक्टाकोर मीडियाटेक प्रोसेर असून २ जीबी रॅम आहे. हा अँड्रॉईड ५.१ लॉलीपॉपवर चालतो. हा ड्युअल सिम स्मार्टफोन आहे. यात इनबिल्ट स्टोरेज १६ जीबी असून १२८ जीबीपर्यंत वाढवण्याची क्षमता आहे. या स्मार्टफोनचा रेयर कॅमेरा १३ मेगापिक्सेल असून फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सेल आहे. तसेच फेस डिटेक्शन ऑटोफोकस आणि बीएसआय सेंसरही आहे. 2700mAh बॅटरी क्षमता आहे.