माऊंट इथोसवरही आहे महिला मुलांना प्रवेश बंदी

greece
अथेन्स- भारतातातील अनेक ठिकाणांवर महिलांना प्रवेश बंदी असल्याची चर्चा नेहमीच सुरू असते. मग ते शनिशिंगणापूर असो, अथवा हाजी अली पीर दर्गा असो. पण हा प्रकार केवळ भारतातच आहे असे मात्र नाही. अन्य बर्‍याच देशांतही महिलांना अशी कांही ठिकाणी प्रवेश बंदी आहे. ग्रीसमधील अत्यंत पवित्र मानल्या जाणार्‍या माऊंट इथोस अशी महिला अथवा लहान मुलांना प्रवेश बंदी आहे. येथे ही बंदी मादी जनावरांसाठीही आहे. म्हणजे गायी, म्हशी, शेळ्या,मांजरी, अशी मादी जनावरेही येथे जाऊ शकत नाहीत.म्हणजे बंदी बाबत हे ठिकाण एक पाऊल जगाच्या पुढेच आहे.

उत्तर ग्रीसमधील हा भाग तसा दुर्गम आहे आणि येथे २० मठ आहेत. तेथे सुमारे दोन हजार माँक राहतात. हे जगातले एक अत्यंत पवित्र स्थळ मानले जाते. पौराणिक काळांतील कांही संदर्भांमुळे येथे महिलांना प्रवेश दिला जात नाही. येथे राहणारे साधक किवा माँक यांनाही अनेक बंधने पाळावी लागतात. उदाहरणार्थ त्यांनी दिवसातले आठ तास चर्चमध्यें घालवावे लागतात. ईश्वर व त्याच्याशी संबंधित वस्तूंशिवाय जगातली अन्य कोणतीही वस्तू त्यांना वापरता येत नाही. येथे स्वयंप्रशासन आहे आणि सूर्योदय व सूर्यास्तानुसार दिवस मोजले जातात. हे मठ १० व्या शतकातले असल्याचेही सांगितले जाते.

Leave a Comment