बुद्धिमत्ता चाचणीत ११ वर्षीय कश्मिया अव्वल

wahi
लंडन – ब्रिटनमधील बुद्धिमत्ता चाचणीत (आयक्यू) मूळ भारतीय असलेल्या ११ वर्षीय मुलीने अव्वल स्थान प्राप्त केले असून कश्मिया वाही नावाच्या या चिमुकलीने मेनसा येथील परीक्षेत सर्वाधिक १६२ गुण संपादन केले आहेत. एवढ्या लहान वयात हा मान पटकाविल्याने तिच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मुंबईत कश्मियाचा जन्म झाला असून चाचणीत १६२ पैकी १६२ गुण पटकावित, महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन आणि स्टीव्हन होकिंस यांच्या पंक्तीत जाऊन ती बसली आहे. दोन्ही शास्त्रज्ञांची आयक्यू लेव्हल १६० इतकी होती. या महान शास्त्रज्ञांसोबत माझी तुलना होत असल्याचे बघितल्यावर मला अतिशय आनंद झाला आहे. माझ्यासाठी ही अतिशय अभिमानाची बाब आहे असे कश्मिया म्हणाली. माहिती तंत्रज्ञान सल्लागार विकास आणि पूजा यांची ती मुलगी असून, ते लंडनमधील ड्यूश बँकेत काम करतात. दोघांचेही सहकार्य यासाठी तिला लाभले आहे. कश्मिया हुशार असल्याची जाणीव आम्हाला होतीच. पण तिच्या या यशाने यावर शिक्कामोर्तब झाले आहे. हे यश निश्‍चितच वाखाणण्यासारखे आहे, असे तिच्या आईवडिलांनी व्यक्त केले आहे.

Leave a Comment