बदलणार ‘भारे’चे रुपडे

railway
भोपाळ : देशी बनावटीच्या कोचने भारतीय रेल्वेचे रुपडे हे पालटायला सुरुवात झाली असून नवीन एसीच्या डब्यापासून याची सुरुवात झाली आहे. अत्याधुनिक सोयी सुविधांयुक्त २४ नवीन कोचची निर्मिती भोपाळच्या रेल्वे कोच फॅक्टरीने केली आहे.

हे कोच ५ वर्षांच्या संशोधनानंतर तयार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व कोच देशी बनावटीचे असून विविध आकर्षक रंगांमध्ये डब्यातील सीट्स तयार केले गेले आहेत. आसनव्यवस्थेतही काही बदल करून ती अधिक आरामदायी बनविली गेली आहे. शिवाय टॉयलेटही अधिक स्वच्छ आणि अत्याधुनिक आहेत. हे कोच रेल्वेमंत्री सुरेश प्रभुंच्या हस्ते रेल्वेला सुपूर्द केले जाणार आहेत. एक स्लीपर कोच तयार करण्यासाठी ५० लाख, तर एसी कोचसाठी ७० लाख रुपयांचा खर्च आला आहे. ११ तारखेला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू या कोचची पाहणी करतील, त्यानंतरच हे कोच कोणत्या टड्ढेनला जोडायचे की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे.