पुढची ८२ वर्षे १५ जानेवारीलाच येणार संक्रांत

makar
तिळगूळ घ्या गोड बोला म्हणत भारतभर दरवर्षी संक्रांतीचा सण १४ जानेवारीला वर्षांनुवर्षे आपण साजरा करत असलो तरी यापुढे ८२ वर्षे संक्रांत १५ जानेवारीलाच येणार आहे असे पंचांगकर्ते सांगतात. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो ती तिथी म्हणजे मकर संक्रांत. यंदाच्या वर्षी सूर्य मकर राशीत पहाटे १ वाजल्यानंतर प्रवेश करत असल्याने ही तिथी १५ जानेवारीला आली आहे. पुढची ८२ वर्षे याच तिथीला संक्रांत येईल व त्यानंतर ती १६ जानेवारीला येईल असे समजते.

भारतात मकर संक्रांतीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. याच दिवशी कपिल मुनींच्या आश्रमात प्रवेश करून राजा सगरच्या १ हजार मुलांना मुक्ती मिळाली होती तसेच याच दिवशी पितामह भीष्म यांनी प्राणत्याग केला होता. मकरसंक्रांतीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि दिवस तीळातीळाने मोठा होत जातो असेही सांगतात. या दिवशी नदी, सरोवरे यांत स्नान करणे अत्यंत पवित्र समजतात आणि संक्रांतीच्या निमित्ताने अनेक प्रकारची दानेही दिली जातात. या दिवशी काळे कपडे, तीळगूळ यांचे महत्त्व असते.