नवी दिल्ली : ‘टाटा स्काय एव्हरीव्हेअर टीव्ही’ या अॅपचे सबस्क्रिप्शन डीटूएच ऑपरेटर टाटा स्कायने युजर्ससाठी पूर्णपणे मोफत केल्यामुळे तब्बल ८० चॅनेल्स युजर्स आता मोफत पाहू शकणार आहेत. युजर्सना या सेवेचा लाभ घेण्याकरता याआधी महिन्याकाठी ६० रुपये मोजावे लागत होते.
तब्बल ८० चॅनेल्स आता टाटा स्कायवर पाहा मोफत
ऑक्टोबर २०१३मध्ये टाटा स्कायने अॅप लॉन्च केले होते. या अॅपमध्ये ८० लाईव्ह चॅनेल्स पाहता येतात. हे अॅप अँड्रॉईडसोबत आयओएस आणि विंडोज युजर्सही इन्स्टॉल करु शकतात. मात्र, सध्या फ्री सबस्क्रिप्शन सुविधा विंडोज युजर्ससाठी देण्यात आली नाही. टाटा स्कायच्या या बंपर ऑफरचा लाभ घेण्यासाठी युजर्सना आपापल्या स्मार्टफोनमध्ये अॅप इन्स्टॉल करावे लागणार आहे. त्यानंतर ही सर्व्हिस तुमच्या स्मार्टफोनमध्ये अॅक्टिव्ह करावी लागेल. त्यानंतर टाटा स्कायकडून तुम्हाला तुमच्या सबस्क्रिप्शन आयडीवर एक मेसेज येईल. या मेसेजची माहिती अॅपमध्ये सबमिट केल्यानंतर फ्री सर्व्हिस अॅक्टिव्ह होईल.