गुगल त्यांचा आधुनिक थ्रीडी स्मार्टफोन जुलैत बाजारात आणणार असल्याचे शनिवारी अमेरिकेतील कंझ्युमर इलेक्ट्राॅनिक शो मध्ये जाहीर केले गेले आहे. गुगलने टँगो नावाने हा प्रोजेक्ट हाती घेतला होता. या प्रोजेक्टसाठी चिनी कंपनी लेनोवोशी गुगलने करारही केला आहे.
गुगलचा थ्रीडी स्मार्टफोन जुलैत येणार
मॅजिक विंडो स्क्रीन असलेला हा स्मार्टफोन युजरला थ्रीडीचा अनुभव देऊ शकणार आहे. तसेच युजरच्या आसपासच्या भागाचा थ्रीडी मॅपही यात तयार होऊ शकणार आहे. त्यासाठी कस्टमाईज्ड हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला आहे.यातील सेंसर एका सेकंदात दीड लाख फ्रेम मधून थ्रीडी इमेज तयार करेल त्यासाठी फोनला चार कॅमेरे दिले गेले आहेत. हे सर्व कॅमेरे एकाचवेळी काम करतील. फोनसाठी ६ इंची डिस्प्ले असेल असेही समजते. या फोनची किंमत साधारण ५०० डॉलर्स म्हणजे ३३ हजार रूपयांपर्यंत असेल.