मोटोरोला आता झाले मोटो बाय लेनोवो

moto
यंदाच्या वर्षापासून लेनोवोने मोटोरोलाचे ब्रँड नेम बदलून ते मोटो बाय लेनोवो असे केले असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. २०१४ मध्ये गुगलकडून लेनोवोने मोटोरोलाची खरेदी केली होती. आता यापुढे कंपनी त्यांचे स्मार्टफोन मोटो बाय लेनोवो याच नावाने विकणार आहे. लास वेगास येथे सुरू असलेल्या सीईएस २०१६ मध्ये कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिक ऑस्टरलो यांनी ही माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार मोटोरोलाचा एम हा लोगो स्मार्टफोनवर कायम राहिल मात्र पॅकींग व अन्य जागी मोटोरोलाऐवजी मोटो बाय लेनोवो असे लिहिले जाईल. कंपनी त्यांचे बजेट फोन वाईबे नावानेच विकणार असून महाग फोन मोटो नावाने विकले जातील. गुगलने २०१२ सालात ही कंपनी १२.५ अब्ज डॉलर्समध्ये खरेदी केली होती.२०१४ साली ही कंपनी लेनोवोने २.९ अब्ज डॉलर्सला खरेदी केली.

Leave a Comment