पहिला पॅसेंजर ड्रोन बनविला चिनी कंपनीने

drone
बीजिंग – चीनच्या एका कंपनीने पॅसेंजर ड्रोन इहांग-१८४ अमेरिकेच्या लास व्हेगासमध्ये चाललेल्या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शो २०१६(सीईएस) मध्ये सादर केला. १०० किलो वजनासह ५०० मीटर उंचीपर्यंत हा ड्रोन उड्डाण भरू शकतो. याला लोकांसमोर गॅझेट शोच्या पहिल्या दिवशी ठेवण्यात आले.

चीनच्या ग्वांगझू स्थित इहांग इंक कंपनीने या ड्रोनला तयार केले असून छोटय़ा हेलिकॉप्टरसारखा दिसणारा हा ड्रोन इलेक्ट्रिक पॉवर्ड आहे आणि दोन तासात फूल चार्ज होऊ शकतो. यात इतर ड्रोनप्रमाणे चार प्रोपेलर्स लावण्यात आले आहेत. १०० किलो वजन घेऊन ३०० ते ५०० मीटरच्या उंचीपर्यंत हा ड्रोन उड्डाण भरू शकतो. याच्या केबिनमध्ये एक व्यक्ती आपल्या सामानासह आरामात बसू शकते. हा जगातील पहिला असा ड्रोन आहे जो एक प्रवासी घेऊन उड्डाण भरेल असा कंपनीचा दावा आहे.

२०१६ च्या अखेरपर्यंत कंपनीचे सहसंस्थापक शँग शियाओनुसार कायदेशीर अनुमती मिळाल्यानंतर याला बाजारात सादर केले जाऊ शकते. याची किंमत २ ते ३ लाख डॉलर्स असू शकते. या ड्रोनला अजून कायदेशीर प्रक्रिया पार पाडावयाच्या आहेत. त्याला योग्य ती मंजुरी मिळाल्यानंतरच ते बाजारात उपलब्ध होऊ शकणार आहे. तसेच विदेशात देखील स्थानिक प्रशासनाकडून याला मंजुरी मिळाल्यानंतरच याची विक्री होऊ शकेल.

Leave a Comment