नोटा अर्पण करून या यात्रेत फेडला जातो नवस

pusegaon
सातारा – महाराष्ट्रातील पुसेगांवच्या सेवागिरी महाराजांचा रथोत्सव प्रसिद्ध असून या यात्रेस सुरुवात झाली आहे.भाविक या रथोत्सवात रथावर नवसपूर्ती म्हणून नोटा अर्पण करतात. हा पैसा ट्रस्ट जलसंधारण आणि समाजकार्यासाठी वापरते.

हा रथोत्सव खटाव तालुक्यातील पुसेगांव येथील श्री सेवागिरी महाराजाच्या पुण्यतिथी निमित्ताने साजरा केला जातो. भाविकाच्या मनोकामना पूर्ण होतात, अशी भावना लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सुमारे पाच ते सात लाख भाविक यात्रा काळात सेवागिरी महाराजाच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतात. यावेळी दुष्काळी भागातील लोकांनी जलसंधारणाची कामे करावीत, असे आवाहन केले आहे. दुष्काळी भागातील पशुधन वाचावे आणि कृषी क्षेत्रातील संशोधन, अवजारे आदी ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी कृषी प्रदर्शनाचेही आयोजन सेवागिरी महाराज ट्रस्ट मार्फत केले जाते. रथोत्सव काळात संत, समाज आणि शासन तिन्ही एकत्र येऊन दुष्काळी भागात समाज उपयोगी कामे करणारा ट्रस्ट म्हणूनही सेवागिरी महाराष्ट्र ट्रस्टचा लौकिक आहे.

Leave a Comment