नवी दिल्ली : पाच वर्षांपूर्वी लाँच झालेला अॅपलचा आयफोन ४एस भारतात ९ हजार ९९९ रुपयांना मिळत आहे. हा स्मार्टफोन २०१४पर्यंत भारतात ३१ हजार ५०० रुपयांना मिळत होता. मात्र त्यानंतर या स्मार्टफोनचे उत्पादन कंपनीने बंद केले.
९ हजार ९९९ रुपयांना आयफोन ४एस
हा आयफोन ग्रीनडस्ट या वेबसाईटवर ९ हजार ९९९ रुपयांना मिळत आहे. ग्रीनडस्ट वेबसाईटनुसार, कंपनीच्या आउटलेटकडून मिळणाऱ्या आयफोनसारखाच हा आयफोन असून तसेच हा फोन अँड्रॉईड असल्याचे कंपनीने म्हणणे आहे. तसेच कंपनी या आयफोनवर ६ महिन्यांची वॉरंटी देत आहे. आयफोनचे सध्या ६एस आणि ६एस प्लस हे चर्चेत असून लवकरच आयफोन ७ही लाँच होणार आहे. मात्र स्वस्त आयफोन खरेदी करायचा असल्यास तुम्ही हा आयफोन घेऊ शकतात.