सलग तिसऱ्यांदा अजीम प्रेमजी झाले भारतीय दानवीर

azmi-premji
नवी दिल्ली – शिक्षणासाठी २७,५१४ कोटी रुपये दान करणारे विप्रोचे संस्थापक अजीम प्रेमजी सलग तिसऱ्यांदा सर्वाधिक दान करणारे भारतीय दानवीर बनले आहेत. यात दुसऱ्या नंदन निलेकणी आणि तिसऱ्या स्थानावर नारायण मूर्ती आहेत.

ह्यूरन इंडिया यांनी जाहीर केलेल्या यादीत ७० वर्षीय अजीम हाशिम प्रेमजी यांना सर्वाधिक दान करणारे भारतीय दानवीर असे संबोधित करण्यात आले आहे. अजीम प्रेमजी यांनी शिक्षणासाठी २७,५१४ कोटी दान केले आहेत. भारतातील शिक्षण सक्षमीकरणाचे काम अजीम प्रेमजी फाउंडेशन करत आहे.

दुसऱ्या स्थानावर असलेल्या नंदन, रोहिणी निलेकणी आणि त्यांच्या कुटुंबियांनी २,४०४ कोटी दान केले आहेत आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या नारायण मूर्ती यांनी १,३२२ कोटी दान केले आहेत.

Leave a Comment