बीएमडब्ल्यूने त्यांच्या दमदार मोटरसायकल सिरीजमधील के १६०० जीटीएल एक्सक्ल्यूझिव्ह बाईक सादर केली असून ही बाईक सध्या तरी भारतात मिळू शकणार नाही. भारतात बीएमडब्ल्यूची के १६०० जीटी ही मोटरसायकल उपलब्ध आहे व तिची किंमत आहे ३३.२१ लाखपासून ३६.२९ लाख रूपये. नवी एक्सक्ल्यूझिव्ह बाईक भारतीय बाजारात आली तर तिची किंमत ४० लाखांपर्यंत असेल असेही सांगितले जात आहे.
बीएलडब्ल्यूची टूअरर के १६०० जीटीएल एक्सक्ल्यूझिव्ह सादर
नव्या बाईकसाठी बीएमडब्ल्यूने २६.५ लिटर इंधन टाकी दिली असून ऑईल/ वॉटरकूल फोर स्ट्रोक इन लाईनचे सहा सिलींडर इंजिन दिले आहे. प्रत्येक इंजिनाला चार व्हॉल्व्ह आहेत आणि इंजिनाची क्षमता आहे १६४९ सीसी. त्याला सहा स्पीड हेलिकल गिअरबॉक्स दिला गेला आहे. गाडीचा टॉप स्पीड ताशी २०० किमीपेक्षा अधिक आहे.