चीनमधले व्हायोलिन चर्च

violin
चीनच्या फोशान प्रांतात एक खास बिल्डींग उभारण्यात आली असून तिला व्हायोलिन वाद्याचा आकार दिला गेला आहे. प्रत्यक्षात ही इमारत म्हणजे चर्च असून येथे संगीतासंबंधीचे शिक्षण दिले जाणार आहे.या सात मजली इमारतीत प्रार्थनाघर, बाहेरून येणार्‍यांना निवासासाठी खोल्या ही उपलब्ध आहेत.

या इमारतीच्या निर्मितीत पुढाकार असलेले यू किंग माहिती देताना म्हणाले की कोणताही धर्म आणि संगीत यांचा संबंध अनन्यसाधारण असतो. हा संबंध अधिक खोलवर जावा आणि अधिक दृढ व्हावा यासाठी आमचा प्रयत्न आहे. या चर्चचे नामकरण व्हायोलिन चर्च ऑफ चायना असे केले गेले आहे.

Leave a Comment