२२ जानेवारीला आसूसच्या झेनफोन झूमचे लाँचिंग

asus
नवी दिल्ली : येत्या २२ जानेवारीला भारतीय बाजारपेठेत ‘आसूस’चा ‘झेनफोन झूम’ हा नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात येणार असून या फोनचे सादरीकरण आग्य्राच्या ताजमहाल येथे होणा-या खास कार्यक्रमामध्ये करण्यात येणार आहे. या फोनची अंदाजे किंमत २६,४९९ रूपये असेल.

कसा आहे आसूसचा झेनफोन झूम – याचा डिस्प्ले : ५.५ इंचाचा असून, यात अँड्रॉईड ५.० हे ऑपरेटींग सिस्टिम देण्यात आले आहे. त्याचबरोबर २.३ गीगाहर्टज् ६४ बीट इंटेल ऍटॉम झेड३५८० क्वॉडकोरचा प्रोसेसर आणि ४ जीबी रॅमदेखील देण्यात आले आहेत. यात इंटरनल स्टोअरेज १६ जीबी असून याच्या बॅटरीची क्षमता ३००० एमएएच एवढी आहे. याचा रिअर कॅमेरा १३ मेगापिक्सलचा तर फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सलचा आहे. हा फोन मेटीओराइट ब्लॅक, ग्लेशियर व्हाईट या रंगात उपलब्ध होणार असून यात ब्ल्यूटय़ूथ, वायफाय, ३जी अशा कनेक्टीव्हीटी देखील आहेत.

Leave a Comment