हे आहेत फेसबुकवर त्रास देणाऱ्या लोकांपासून वाचण्याचे काही उपाय

facebook1
फेसबुकवरच्या फ्रेंडलिस्टमध्ये बऱ्याच जणांची हजारो लोकांशी मैत्री असते. यात बहुतेकदा कुटुंबातील व्यक्ती, ऑफिसमधील सहकारी, शाळा-कॉलेजमधील नवीन जुने मित्र असे सगळे सामील असतात. पण यातील असेही बरेच असतात ज्यांना आपण ओळखतही नाही पण सहजच फ्रेंडलिस्टमध्ये अॅड करतो. अनेकदा असे लोक आपल्या टाईमलाईनवर नको त्या पोस्ट टाकतात आणि त्यामुळे लाजिरवाणा प्रसंग आपल्यावर ओढवतो. अशा लोकांपासून वाचण्याचे काही उपाय आपल्याला खाली दिले आहेत जे फेसबुक वापरताना आपल्याला खूप उपयोगी पडतील.

अशी टाळा अनोळखी लोकांची फ्रेंड रिक्वेस्ट – जर आपल्याला कोणाची फ्रेंड रिक्वेस्ट मान्य करायची नाही पण तरीही ती व्यक्ति सतत फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असेल तर आपल्या पेजवर होम ऑप्शनमध्ये पाठविण्यात आलेली रिक्वेस्ट इग्नोर करण्याचा ऑप्शन दिलेला असतो. यात रिक्वेस्ट पाठविणाऱ्या व्यक्तिला तुम्ही त्याला डिलीट केले आहे याची माहितीपण मिळणार नाही.

पूर्णपणे शेअर करणे बंद करा – जर आपल्याला वाटत असेल काही ठराविक लोकांनीच तुमची पोस्ट पाहावी तर याच ऑप्शनमध्ये कस्टम सेटींमध्ये जाऊन ज्या व्यक्तिने तुमची पोस्ट पाहु नये असे वाटत असेल त्याचे नाव टाईप करा. त्या व्यक्तिला तुमची पोस्ट दिसणार नाही.

संबंध ठरवा – तुम्ही तुमच्या फ्रेंडलिस्टमध्ये मित्रांची कॅटेगिरी निवडू शकतात. पहिल्यात क्लोज फ्रेंड म्हणजे जवळचे मित्र, एक्‍वेंटेंसेज म्हणजे फक्त ओळख आणि रिस्ट्रीक्टेड म्हणजे अशा व्यक्तिंना या कॅटेगरीत येण्यास रोखू शकतात.

क्लोज फ्रेंड नोटीफिकेशनपासून वाचण्यासाठी – जर आपल्याला सतत क्लोज फ्रेंडकडून नोटीफिकेशन येत असतील तर फ्रेंडलिस्टमध्ये जाऊन मॅनेज ऑप्शनमध्ये योग्य पर्याय निवडावा लागेल.

Leave a Comment