फेब्रुवारीत येणार शाओमीचा बहुप्रतीक्षित Mi5

xiaomi
मुंबई : शाओमीचा Mi5 हा स्मार्टफोन गेल्या काही महिन्यांपासून कायम चर्चेत राहिला आहे. मोबाईल प्रेमींमध्ये या स्मार्टफोनच्या लॉन्चिंगबाबत प्रचंड उत्सुकता होती. अखेर फेब्रुवारीत शाओमीचा Mi5 स्मार्टफोन लॉन्च होणार आहे.

चायनिज सोशल मीडिया विबोवर याबाबतची माहिती शाओमीचे सहसंस्थापक लिवान जियांग यांनी दिली आहे. चीनमधील स्प्रिंग फेस्टिव्हलनंतर शाओमी Mi5 लॉन्च होईल. शिवाय, या स्मार्टफोनमध्ये ८२ स्नॅपड्रॅगन प्रोसेसर असेल, अशीही माहिती जियांग यांनी दिली.

शाओमी Mi5 स्मार्टफोनचे काही दिवसांपूर्वी फोटो लिक झाले होते. या फोटोंनुसार, समोरील बाजूस २.५ डी ग्लास आणि बॅक कव्हर Mi Note सारखी असून होम बटनवर फिंगरप्रिंट रीडर असण्याचीही शक्यता आहे. शाओमीच्या याधीच्या सर्व स्मार्टफोनपेक्षा शाओमी Mi5चे डिझाईन पूर्णपणे वेगळे असणार आहे. मागच्या बाजूस ड्युअल एलइडी फ्लॅशसोबत रिअर कॅमेराही असेल. मात्र, कॅमेऱ्यासाठी लेझर फोकस सिस्टम मिळण्याची शक्यता कमी आहे. शाओमी Mi5 स्मार्टफोनला १६ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि ६ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

४ जीबी रॅम स्मार्टफोनमध्ये असतील मात्र, १६ जीबी, ६४ जीबीच्या व्हेरिएंटमध्येही हा स्मार्टफोन उपलब्ध असणार आहे. लिक झालेल्या माहितीनुसार, ३०३० mAh क्षमतेची बॅटरी आणि ५.१.१ लॉलिपॉपवर आधारित एमआययूआय७ वर काम करेल. या व्यतिरिक्त फिंगरप्रिंट स्कॅनर टेक्नॉलॉजीचा शाओमी Mi5 स्मार्टफोनमध्ये वापर केला गेला आहे.

Leave a Comment