मारुतीने दाखल केली ऑटो गियर शिफ्ट डिझायर

maruti1
नवी दिल्ली : आपले प्रसिद्ध मॉडेल डिझायर डिझेलचे ऑटो गियर शिफ्ट वेरिएंट मारुती सुझुकीने दाखल केले असून ऑटो गियर तंत्रज्ञान असलेल्या डिझायरची किंमत ८.३९ लाख रुपये आहे.

आपली प्रसिद्ध कार स्विफ्ट डिझायर सेडानची रेंज वाढवत असून त्याचे एएमटी मॉडेल मारुती सुझुकीने तयार केले आहे. ही डिझेल कार असून यामध्ये एजीएस तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. डिझायरसह मारुतीच्या पोर्टफोलियामध्ये चार ऑटो गियर शिफ्ट कार दाखल झाल्या आहेत. डिझायर एजीएस मॉडेलचे मायलेज २६.५९ किमी प्रति लिटर असल्याचे, मारुती सुझुकी इंडियाचे कार्यकारी संचालक आर. एस. कल्सी यांनी माहिती देताना म्हटले आहे.

Leave a Comment