जर्मनीत बनतोय जगातला पहिला सायकल हायवे

highway
सायकलींसाठी कार हायवे प्रमाणेच सर्व सुविधा असलेला सायकल हायवे बनविणारा जर्मनी हा जगातला पहिला देश बनला आहे. एकूण १०० किमी अंतराच्या या हायवेतील ५ किमीचा टप्पा नुकताच वापरासाठी खुला केला गेला असुन आणखी कांही दिवसांतच १० शहरे व ४ विद्यापीठे या हायवेला जोडली जाणार आहेत.

या कारफ्री बाईक हायवेवरही अन्य हायवे प्रमाणेच सर्व सुविधा आहेत. वेगळ्या वेगळ्या व रूंद लेन आहेत व त्यामुळे ओव्हरटेक करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध झाली आहे. या हायवेवर ट्रॅफिक लाईटही आहेत. मिळालेल्या माहितीनुसार प्रादेशिक विकास ग्रुप आरव्हीआर ने केलेल्या सर्वेक्षणात सुमारे साडेतीन किमीच्या परिसरारत २० लाख नागरिकांची वस्ती असल्याचे दिसून आल्यानंतर सायकल हायवेचा निर्णय घेतला गेला.

या हायवेमुळे रस्त्यावर किमान ५० हजार वाहने कमी येतील असा अंदाज आहे. शिवाय सायकल चालविण्यामुळे आरोग्य सुधारेल व पर्यावरणालाही फायदा होईल असाही विचार त्यामागे आहे. या हायवेसाठी १३०० कोटी रूपये खर्च आला असून त्या खर्चाचा भार कोणत्याही नगरपरिषदेवर पडू न देता सरकारने हा भार उचलला आहे असेही समजते.

Leave a Comment