२ हजार कोटींचा ‘काळा कर’ वसूल

black-money
नवी दिल्ली – आपल्याकडील काळा पैसा घोषित करून त्यावर कर भरण्याच्या योजनेअंतर्गत २ हजार ४२८ कोटी रूपयांची करवसुली करण्यात आली, अशी घोषणा सरकारने केली असून अपेक्षेपेक्षा ही वसुली कमी असली तरी समाधानकारक असल्याचे सांगण्यात येत आहे. ही योजना गेल्या वर्षी अंमलात आणण्यात आली होती. करचुकवेगिरी करणा-यांना ती अखेरची संधी होती.

देशभरातील ६४४ व्यक्ती आणि संस्थांनी या योजनेअंतर्गत आपल्याकडील बेहिशेबी संपत्ती घोषित करून त्यावर कराचा भरणा केला होता. या योजनेचा ३० सप्टेंबर २०१५ हा अंतिम दिवस होता. घोषित काळय़ा धनावर ३० टक्के दराने करवसुली करण्यात आली. कराची ही रक्कम ४ हजार १६४ कोटी रूपये इतकी होते. तथापि, ३१ डिसेंबर २०१५ या दिवसापर्यंत २ हजार ४२८ कोटी रूपये वसूल करण्यात आले.

Leave a Comment