सोमवारची डोकेदुखी टाळणार कशी?

headache
शनिवार आणि रविवारची सुट्टी छान घालवली आणि सोमवारी सकाळी जाग आली की अंगात विलक्षण आळस भरला असल्याची जाणीव होते. काही वेळा त्या आळसापोटी शरीर तर जड होतेच पण डोकेसुध्दा दुखायला लागते. अशावेळी काही साध्या उपायांनी ही डोकेदुखी कमी करता येत असते. तिच्यासाठी काही औषध घेतले पाहिजेच असे नाही. तेव्हा डोक्यासाठी गोळी घेण्यापेक्षा खालील सोपे उपाय करावेत असा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे.

या प्रक्रियेमध्ये अंग जड होण्याचे आणि थकल्याची जाणीव होण्याचे कारण म्हणजे डीहायड्रेशन. हे डीहायड्रेशन कमी व्हावे म्हणून भरपूर पाणी प्यावे किंवा पाण्यावर भागत नसेल तर सरबत प्यावे. त्याचबरोबर फळांचे रस प्राशन करावे. साधारणतः असा आळस आला की लोक चहा किंवा कॉफी पितात. त्यांच्यामुळे उत्तेजना येते असे त्यांना वाटते परंतु ही पेये डीहायड्रेशन वाढवणारी असतात. म्हणून चहा कॉफी न पिता फळांचे रस प्यावे त्याचबरोबर डोक्याला हलकेच मसाज करावा आणि मसाज करताना हात डोक्यावर दाबून धरावा. साधारणपणे दोन तीन मिनिटे असा मसाज केला की मेंदूतला रक्तप्रवाह वाढतो आणि डोके हलके होते.

या डोकेदुखीवर आणखी एक उपाय आहे. तो म्हणजे डोळे झाकून शांतपणे पडणे. असे पडल्याने खांद्याला आणि मानेला व्यायाम मिळतो. अशी विश्रांती संपली की गरम पाण्याचा शॉवर बाथ घ्यावा आणि तो संपल्यानंतर भरपूर हसावे. कसलेली टेंशन घेऊन नये. स्वच्छ मोकळ्या हवेत दीर्घ श्‍वसन करावे आणि साधारण पाचशे पावले भरभर चालून तेवढीच पावले परत यावे. तुमचा फे्रशनेस परत येतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment