भारतात लाँच झाले नेटफ्लिक्स

netflix
मुंबई : भारतात मीडिया स्ट्रिमिंग सर्व्हिस नेटफ्लिक्स (Netflix) लाँच झाली असून आता तुम्हाला ‘नेटफ्लिक्स’मुळे मागणीनुसार टीव्ही शो किंवा चित्रपट ऑनलाईन पाहता येऊ शकेल. यासाठी महिन्याला ५०० रुपयांचा दर निश्चित करण्यात आला आहे. त्याचबरोबर ही सुविधा पहिल्या महिन्यात फुकटात वापरता येणार आहे.

कंपनीचे सीईओ रीड हॅस्टिंग्स यांनी अमेरिकेच्या लास वेगास शहरात सुरु असलेल्या ‘कन्ज्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो २०१६’मध्ये‘नेटफ्लिक्स’ सुविधा भारतात सुरु करत असल्याची घोषणा केली.

तुम्ही कधीही, कुठेही कोणताही टीव्ही शो, नाटक, डॉक्युमेंटरी किंवा चित्रपट ‘नेटफ्लिक्स’मुळे मागणी केल्यानंतर ऑनलाईन पाहू शकाल. १९९७ मध्ये अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात ‘नेटफ्लिक्स’ ही सुविधा डीव्हीडी रेंटल सर्व्हिस तत्वावर सुरु झाली होती. आजही अमेरिकेत ‘नेटफ्लिक्स’ सुरु असून या सुविधेने व्यापक रुप धारण केले आहे.

तुम्हाला ‘नेटफ्लिक्स’साठी www.netflix.com/in/ या वेबसाटईला भेट देऊन तिथे तुमचे खाते खोलावे लागेल. तुम्ही रजिस्ट्रेशन करतानाच याचे पेमेंट करावे लागेल. यासाठी तुम्ही क्रेडिट, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापरू शकता. ‘नेटफ्लिक्स’ भारतात दर महिना ५०० रुपयांत उपलब्ध करण्यात आले असून याशिवाय युझर ६५० रुपयांत ४ स्क्रीन्सवर कंटेट पाहू शकेल. तर ८०० रुपयांमध्ये ४के अल्ट्रा एचडी कंटेट चार स्क्रीन्सवर पाहता येईल. विशेष म्हणजे पहिल्या महिन्यासाठी कोणताही चार्ज आकारण्यात येणार नाही.

Leave a Comment