एचएमटी घड्याळ्याची टिकटिक थांबणार

hmt
मोदी सरकारने एचएमटी घड्याळे निर्मितीची तीन युनिट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एचएमटी, एचएमटी चिनार आणि या घडयाळांसाठी बेअरिंग बनविणारी कंपनी अशा तीन युनिटचा त्यात समावेश असून या युनिटमधील १ हजार कामगारांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यास सांगितले गेले आहे. त्यासाठी सरकार ४२७.४८ कोटी रूपये देणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मोदी अध्यक्ष असलेल्या सीसीईआयच्या बैठकीत ही युनिट बंद करण्यासंदर्भातला निर्णय घेतला गेला.वास्तविक नुकसानीत असलेल्या एचएमटी सारख्या सरकारी कंपन्या बंद करण्याचा निर्णय पूर्वीच झाला होता मंजुरीसाठी तो वित्त विभागाकडे पाठविला गेला होता. ही परवानगी मिळाल्यानंतर तो जाहीर केला गेला आहे.

हिंदुस्थान मशीन्स अॅन्ड टूल्स (एचएमटी)ही १९५३ साली सुरू झालेली कंपनी सुरवातीला ट्रॅक्टर व बेअरिंग उत्पादन करत असे. नंतर जपानच्या सिटीझन कंपनीच्या सहकार्याने १९६१ मध्ये बंगलोर येथे घड्याळ निर्मिती सुरू करण्यात आली. किल्लीची ही घड्याळे एकेकाळी स्टेटस सिंबॉल मानली जात असत. कंपनीची पिंजोर, कालमसोरी, हैद्राबाद व अजमेर येथे युनिट आहेत. २००० सालापासून ही कंपनी नुकसानीत आहे.

Leave a Comment