
मुंबई – केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाच्या ‘अतुल्य भारत’ अभियानाचे नवे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आली आहे.
अभिताभ बच्चन ‘अतुल्य भारत’चे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर
पर्यटन विभागाने कालच आमीर खानला अतुल्य भारत अभियानातून डच्चू दिल्याचे जाहीर केले होते. आमीरला असहिष्णुतेबाबत केलेले वक्तव्य भोवल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर आज महानायक अमिताभ बच्चन यांना ‘अतुल्य भारत’चे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनवण्यात आले आहे.
प्रसून जोशी मॅकेन एरिक्सन लिमिटेड या कंपनीसोबत २.६९ कोटी रुपयात ‘अतुल्य भारत’ अभियानाचा करार झाला होता. मात्र तो करार रद्द झाल्याने आता आमीर खान अतुल्य भारतचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर नसेल, असे पर्यटन विभागाने स्पष्ट केले.
