पाकिस्तानच्या २० वेबसाइट्सवर भारतीय हॅकर्सचा कब्जा

hacker
नवी दिल्ली – भारतीय हॅकर्सनी पठाणकोट येथील पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान शासनाच्या सुमारे २० वेबसाइट्स हॅक केल्या आहेत. या हॅकर्सनी पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याचा हा सूड असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तान मात्र याबाबतीत मूग गिळून स्वस्थ बसले आहे.

एका ब्रिटिश वेबसाइट्सने भारतीय हॅकर्सचा हवाला घेऊन असे म्हटले आहे. की आमचे लष्कर पाकिस्तानी हल्ल्याला जशास तसे या न्यायाचे उत्तर देऊ शकत नसेल तर आम्ही स्वस्थ बसू शकत नाही. संगणकीय जगामध्ये आम्ही सूडादाखल योग्य उत्तर देऊच देऊ. सायबर क्राइम तज्ञांनी व्यक्त केलेल्या मतानुसार भारताचे कित्येक हॅकर समूह एकत्र येऊन पाकिस्तानचे वेबसाइट्स बंद पाडत आहेत. या हॅकर्सनी जमात-उद-दावा, लष्कर-ए-तोयबा, सिमी तसेच इंडियन मुजाहिदीन या संघटनांच्या प्रचार वेबसाइट्सना लक्ष्य करून त्यांचे कामकाज बंद पाडले आहे.

गेल्या तीन दिवसांमध्ये पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानात संगणकीय हल्ल्यांचे प्रमाण वाढले असून वेबसाईट्स बंद पाडल्यानंतर तिरंगा फडकलेले दृष्य दिसू लागले आहे. इतकेच नव्हे तर त्यासोबत देशभक्तीपर गाणीही वाजविली जातात. पाकिस्तानी संगणकीय विश्व भारतीय हॅकर्सनी केलेल्या सायबर हल्ल्यामुळे हादरले आहे. तेथील अनेक सरकारी वेबसाइटस हॅक झाल्याने कामकाजावर प्रभाव पडला आहे. या वेबसाइटस पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी तेथील संगणक विशेषज्ञ प्रयत्न करत असले तरी याला काही काळ निश्चितच लागणार आहे.

Leave a Comment