कंपनीचे नांव घेणारे हे अनोखे गांव

shivnagar
उत्तरप्रदेशाच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यातील शिवनगर या गावाचे नांव तेथील ग्रामस्थांनी स्नॅपडीलनगर डॉट कॉम असे केले असून या नावाची पाटीही लावली आहे. गावाचे मूळचे नांव बदलून एखाद्या कंपनीचे नांव गावाला देण्याची देशातली ही पहिलीच घटना आहे. विशेष म्हणजे या बदलाची तेथील अधिकार्‍यांना मात्र माहिती नाही.

मिळालेल्या माहितीनुसार या गावात गेली अनेक वर्षे पाणीटंचाईची समस्या आहे. येथील ग्रामस्थांना स्वच्छ पाण्यासाठी दूरवर तंगडतोड करावी लागते. सरकारात वारंवार तक्रारी करूनही कांही उपयोग होत नाही. ई कॉमर्स कंपनी स्नॅपडीलचे सीईओ कुणाला बहल म्हणाले कंपनीने या गावाची पाणीटंचाई समस्या लक्षात घेऊन सुमारे ३ लाख २५ हजार रूपये खर्च करून येथे १५ हातपंप बसविले व पाण्याची समस्या दूर झाली. या पंपांवर स्नॅपडीलचे नांव आहे. दरवर्षी कंपनी त्यांच्या नफ्यातील कांही भाग सामाजिक कार्यासाठी देत असते. त्यातून हे काम केले गेले.

त्यानंतर गावकर्‍यांनी कंपनीने केलेल्या कामाबद्दल आभार मानण्यसाठी गावाचे नांव बदलून स्नॅपडीलनगर असे करण्याचा निर्णय घेतला व तो अमलात आणला आहे.

Leave a Comment