हेनीन प्रांतात माओचा ३६ मीटर उंचीचा पुतळा

mao
चीनमधील गरीब भाग समजल्या जाणार्‍या हेनान प्रांतात चीनचा माजी चेअरमन माओ त्से तुंगचा ३६ मीटर (सुमारे १२० फूट) उंचीचा भव्य पुतळा उभारला जात असून स्टील व काँक्रीटच्या सहाय्याने बनविलेल्या या पुतळ्याला सोनेरी रंग दिला गेला आहे. या पुतळ्यासाठी ३ कोटी रूपये खर्च आला असल्याचेही समजते. माओ पिपल्स रिपब्लीक ऑफ चायनाचा संस्थापक व कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचा अध्यक्ष होता.

कॅफिंग शहरातील टोंग्शू काऊंटी येथे त्यावेळी चेअरमन माओने राबविलेल्या औद्योगिक धोरणांमुळे भयानक दुष्काळ पडला होता व त्यात लक्षावधी लोक प्राणास मुकले होते. याच भागात हा पुतळा उभारला गेला आहे. १९४९ ते १९७६ या काळात माओने जी औद्योगिक धोरणे अवलंबिली त्याची परिणीती हा प्रांत उजाड होण्यात झाली व तेथे भयानक दुष्काळ पडला. त्यात साडेचार कोटी लोकांचे प्राण गेले होते. इतिहासात या घटनेची नोंद ग्रेटेस्ट मास मर्डरर अशी झाली आहे. माओ चीन क्रांतीचा प्रणेता म्हणूनही ओळखला जातो. त्याने स्थापन केलेल्या रेड आर्मीची दहशत आजही चीनमध्ये जाणवते.

Leave a Comment