ओप्पोचा कॅमेरा सेंट्रीक स्मार्टफोन येतोय

oppo
ओप्पो या चिनी स्मार्टफोन उत्पादक कंपनीने लवकरच कॅमेरा सेंट्रीक स्मार्टफोन लाँच केला जात असल्याची घोषणा केली असून हे फोन एफ सिरीज नावाचे लाँच केले जाणार आहेत. युजरला मस्त फोटोग्राफी करता यावी हे लक्षात घेऊन नवीन स्मार्टफोन बनविले जात आहेत.

कंपनीचे उपाध्यक्ष स्काय ली म्हणाले की एफ सिरीजचे हे फोन मार्केटमध्ये इंट्रोड्यूस करण्यास आम्ही उत्सुक आहोत. यामुळे जगभरातील युजर्स ओप्पोच्या उत्तम फोटोग्राफी तंत्रज्ञानाचा वापर करू शकतील. फोनचे डिझाईन आकर्षक असेल आणि हे फोन खास फिचर्ससह येतील. गेल्याच महिन्यात कंपनीने आफटर सेल सर्व्हीस पॉलिसी लाँच केली असून त्या अंतर्गत २०० सर्व्हीस स्टेशन उघडली जात आहेत. कंपनीने ३० दिवसांत हँडसेट रिप्लेसमेंट वॉरंटी व नवीन हँडसेटवर दोन वर्षांची एक्सटेंडेड वॉरंटी स्कीमही सुरू केली आहे.

Leave a Comment