एलजीने लाँच केला के ७ आणि के १० स्मार्टफोन

lg
मुंबई: के सीरिजमधील के ७ आणि के १० स्मार्टफोन एलजी कंपनीने लाँच केले असून या स्मार्टफोनची किंमत आणि उपलब्धता याबाबत सध्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

कसा आहे एलजीचा के १० – यात ५.३ इंचाचा एचडी स्क्रिन आणि ७२०×१२८०रेझोल्यूशन पिक्सलचा डिस्प्ले देण्यात आला असून त्याच अँड्रॉ़ईड ५.१ लॉलिपॉपचे ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आले असून हा फोन दोन वेरिएंटमध्ये असून एकामध्ये ३जी आणि दुसऱ्यात ३जी सपोर्ट देण्यात आली आहे. के १० मध्ये १.३ GHz क्वॉड-कोअरचा प्रोसेसर देण्यात आला आहे. याचा रिअर कॅमेरा १३ मेगापिक्सल आणि फ्रंट कॅमेरा ८ किंवा ५ मेगापिक्सलचा असेल. ३जी आणि ४जी या आपल्या दोन वेरिएंटला तीन प्रकारच्या रॅम देणार आहे. १ जीबी, १.५ जीबी आणि 2 जीबी यामध्ये इंटनरनल मेमरी ८ आणि १६ जीबीची असणार आहे.

कसा आहे एलजीचा के ७ – यात ५ इंचाचा एचडी स्क्रिन आणि ८५७×४८०रेझोल्यूशन पिक्सलचा डिस्प्ले देण्यात आला असून त्याच अँड्रॉ़ईड ५.१ लॉलिपॉपचे ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आले असून हा फोन दोन वेरिएंटमध्ये असून एकामध्ये ३जी आणि दुसऱ्यात ३जी सपोर्ट देण्यात आली आहे. ३जी वेरिएंटमध्ये १.३ GHz क्वॉड-कोअर प्रोसेसर आणि ४जी वेरिएंटमध्ये १.१ GHz क्वॉड-कोअर चिपसेटचा प्रोसेसर देण्यात आला आहे. याचा रिअर कॅमेरा ८ किंवा ५ मेगापिक्सल आणि फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सलचा असेल. ३जी आणि ४जी या आपल्या दोन वेरिएंटला १ जीबी, १.५ जीबी रॅम आणि इंटनरनल मेमरी ८ आणि १६ जीबीची असणार आहे. याच्या बॅटरीची क्षमता २१२५ mAh एवढी आहे.

Leave a Comment