अमेरिकेत वोक्सवॅगनवर फसवणुक केल्याप्रकरणी खटला

volkswagen
वॉशिंग्टन- अमेरिकेत जर्मन ऑटोमोबाईल कंपनी वोक्सवॅगनवर खटला दाखल करण्यात असून कंपनीने आपल्या ६ लाख गाडय़ांमध्ये बसवण्यात आलेल्या साधनांमुळे प्राणघातक कार्बन उत्सर्जन अतिरिक्त प्रमाणात होत असल्याचा आरोप केला आहे, जर्मन वाहन कंपनीला या खटल्यामुळे तब्बल २० अब्ज अमेरिकन डॉलर इतका दंड होऊ शकतो.

अमेरिकेच्या न्याय विभागाने दाखल केलेल्या खटल्यात म्हटले आहे की, इपीए आणि कॅलिफोर्निया हवाई साधनसंपत्ती मंडळाकडे केलेल्या अर्जात कंपनीने जी माहिती दिली होती, त्यापेक्षा वेगळी रचना वोक्सवॅगनने आपल्या गाम्डय़ांमध्ये बसवल्यामुळे स्वच्छ हवा कायद्याचा भंग केला आहे.
कंपनीच्या ६ लाख डिझेल इंजिन गाडय़ांमध्ये बसवण्यात आलेल्या बेकायदा साधनांमुळे कार्बनचे उत्सर्जन जादा प्रमाणात होत असल्याचा आरोप आहे. कार उत्पादक आपल्या वाहनांसाठी योग्य प्रमाणपत्र घेऊ शकले नाही आणि उत्सर्जन नियंत्रण व्यवस्था योग्य राखली नाही तर तो सार्वजनिक विश्वासघात असून सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणारे ठरते,असे न्याय विभागाचे पर्यावरण व नैसर्गिक स्त्रोत विभागाचे सहाय्यक अ‍ॅटर्नी जनरल सी. क्रुडन यांनी सांगितले.

वोक्सवॅगनच्या ऑडी आणि पोर्श या ब्रँडच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. एकूण दंड किती होईल, हे न्याय विभागाने स्पष्ट केले नसले तरीही एकूण २० अब्ज डॉलर असेल, असा अंदाज आहे. वोक्सवॅगनने कशी फसवणूक केली, हे सांगताना न्याय विभागाने म्हटले आहे की, फक्त चाचणीच्या वेळेस उत्सर्जनाचे नियंत्रण संपूर्ण दाखवते, असे सॉफ्टवेअर कंपनीने बसवले आहे. प्रत्यक्षात ही वाहने रस्त्यावर येतात तेव्हा उत्सर्जन नियंत्रण साधनांची क्षमता मोठय़ा प्रमाणावर कमी झालेली असते.

Leave a Comment