शारीरिकदृष्ट्या सदृढ नसते लठ्ठ व्यक्ती

fat
लंडन : अनेक लठ्ठ व्यक्ती मी लठ्ठ असलो तरी धडधाकट (फिट) असल्याचे बोलतात. म्हणजे आम्ही शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याचा त्यांचा दावा असतो पण लठ्ठपणा हा शरीरासाठी धोकादायक आहे. लठ्ठ व्यक्ती कधीही शारीरिकदृष्ट्या सुदृढ नसते, असे स्वीडिश शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. लठ्ठपणाच्या नावाखाली धडधाकट असल्याचा समज असलेल्या लोकांचे आरोग्य चांगले नसते, असा दावा या शास्त्रज्ञांनी केला आहे.

सुदृढ शरीर ठेवण्यासाठी न केले गेलेल्या प्रयत्नांचे विश्लेषण या संशोधनात चांगल्या प्रकारे मांडण्यात आले आहे तर संशोधनातील निष्कर्षांची पडताळणी लोकसंख्येच्या जुन्या पिढीवर केली गेली आहे. यातील काही संशोधनाचे विश्लेषण हे व्यायाम आणि युवा वर्गाचे आरोग्य यांच्यात सरळ संबंधांना गृहीत धरून केले गेले आहे. स्वीडनमधील उमेया विद्यापीठाने केलेल्या संशोधनात २९ वयोगटातील जवळपास १३ लाख १७ हजार ७१३ लोकांचा समावेश आहे. त्यांच्या व्यायामानंतरची मृत्यूची सरासरी निरीक्षणे आणि लठ्ठपणाचा त्यावर होणारा परिणाम याविषयीचे विश्लेषण केले गेले आहे. या वेळी संशोधकांनी विशिष्ट घटकांचे परीक्षण करताना त्यांना जोपर्यंत थकवा येत नाही तोपर्यंत व्यायाम करावयास सांगितले. या निरीक्षणात व्यायाम करणा-या पाचव्या श्रेणीतील पुरुषां-मधील मृत्यूचे प्रमाण ४८ टक्के आहे तर त्याखालील श्रेणीतील लोकांमध्ये हे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले.

या वेळी आत्महत्या, अल्कोहोल आणि अमली पदार्थांच्या सेवनामुळे मृत्यू होण्याच्या प्रमुख कारणांचादेखील अभ्यास केला गेला. याबाबत आम्ही फक्त तर्क व्यक्त करीत असून अनुवांशिक घटकांचा प्रभाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच व्यायामाचा आणि अनुवांशिकतेवरील नियंत्रणाचा घनिष्ठ संबंध असल्याचा दावा उमेया विद्यापीठाच्या संशोधनाच्या अभ्यासक पीटर नॉर्डस्ट्रोम यांनी केला आहे. या संशोधनाने धष्टपुष्ट पण सदृढ ही संकल्पना ठीक असल्याचे म्हटले आहे. दरम्यान संशोधनात अतिव्यायाम करण्यामागे लठ्ठपणा कमी करणे हा एकमेव उद्देश असल्याचे स्पष्ट केले आहे पण पूर्वीपासूनच प्रमाणापेक्षा अधिक लठ्ठपणा असलेल्यांवर यांचा कोणताही परिणाम होत नसल्याचे म्हटले आहे.