भारतीय बाजारपेठेत लवकरच दाखल होणार फियाटची पुंटो प्युअर

fiat
नवी दिल्ली : लवकरच फियाट पुंटो इवोचे नवीन व्हर्जन फियाट पुंटो प्युअर प्रसिद्ध मोटार उत्पादक कंपनी फियाट बाजारात दाखल करणार असून या मोटारींची दिल्ली एक्स शोरूममध्ये किंमत ४.९ ते ५.५ लाख रूपये असेल.

फियाटने ९० बीएसपी इंजिनचे व्हर्जन सादर करून पुंटोला सर्वांत पॉवरफूल मोटारींच्या रांगेत नेऊन बसविले आहे. दोन इंजिन ऑप्शनमध्ये फियाट पुंटो प्यूअर दाखल होत असून यामध्ये १.३ लिटर मल्टीजेट टर्बोचार्ज्ड डिझेल इंजन आणि १.४ लिटर फायर पेट्रोल इंजिनचा समावेश आहे. याशिवाय ही मोटार तीन ट्रीम ऍक्टीव, डायनामिक आणि इमोशनमध्ये उपलब्ध होणार आहे. टाटा बोल्ट, मारूती सुझुकी बलेनो, हय़ुंदाई आय-२० आणि वोक्सवॅगन पोलोसोबत फियाट पुंटो प्यूअरची स्पर्धा असेल.